सॅम बहादूर या चित्रपटात मुख्य भूमिका
बॉलिवूडची दंगल गर्ल फातिमा सना शेख सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात सक्रीय असते. अभिनेत्री स्वतःची छायाचित्रे-चित्रफिती शेअर करून चाहत्यांशी संवाद साधत असते. फातिमाने आता स्वतःचा आगामी चित्रपट ‘सॅम बहादूर’संबंधी तयारी सुरू केली आहे.
फातिमा या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार असल्याचे समजते. या व्यक्तिरेखेसाठी तिने तयारीही सुरू केली आहे. इंदिरा गांधी यांच्या बालपणापासून राजकीय जीवनाशी निगडित मुलाखती ती पाहत आहे तसेच अनेक लेखांचे वाचन करत आहे.
इतिहास बदलून टाकणाऱया प्रसिद्ध व्यक्तींविषयी जाणून घेणे खरोखरच अत्यंत रंजक आहे. सॅम बहादूर हा चित्रपट माझ्यासाठी अत्यंत विशेष आहे. यात मी मेघना गुलजार यांच्यासोबत काम करत असल्याचे फातिमाने म्हटले आहे.
1971 च्या भारत-पाक युद्धाचे नायक देशाचे सैन्यप्रमुख आणि पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत असून विक्की कौशल हा सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारत आहे. तर अभिनेभी सान्या मल्होत्रा ही माणेकशॉ यांची पत्नी सिल्लू माणेकशॉ यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत फातिमा दिसून येणार आहे.
फातिमा लवकरच ‘धक धक’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात ती संजना सांघी अन् रत्ना पाठक यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती तापसी पन्नूने केली आहे. फातिमा यापूर्वी थार या चित्रपटात दिसून आली होती.