निकटवर्तीयांना त्रास दिला जातोय
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांना मिळणाऱया घटनात्मक अधिकाराचा वापर करत ऍटर्नी जनरल यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यास नकार दिला आहे. मागील वर्षी 6 जानेवारी रोजी झालेली हिंसा आणि व्हाइट हाउसशी निगडित काही दस्तऐवजांबद्दल ट्रम्प यांची चौकशी करण्यात येणार होती. अमेरिकेच्या राज्यघटनेतील पाचव्या दुरुस्ती अंतर्गत ट्रम्प कुठल्याही अधिकाऱयासमोर हजर राहण्यास किंवा साक्ष देण्यास नकार देऊ शकतात. तपास यंत्रणा एफबीआय माझ्या विरोधात बनावट पुरावे निर्माण करतेय. माझ्या निकटवर्तीयांना त्रास दिला जात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या निवासस्थानी एफबीआयने सोमवारी धाड टाकत काही दस्तऐवज ताब्यात घेतले होते.
पाचव्या घटनादुरुस्ती अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करावा असा सल्ला वकिलांनी दिला आहे. यामुळे न्यूयॉर्कच्या ऍटर्नी जनरल यांच्या प्रश्नांना उत्तरं देणार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.