रिझर्व्ह बँक घेऊ शकते निर्णय
वृत्तसंस्था/ मुंबई
रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार नेफ्टच्या माध्यमातून पैशाच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारावर आता शुल्क लागू केले जाणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यासंदर्भात रिझर्व्ह बँक लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावानुसार दोन लाख रुपयांहून अधिकचा पैशाचा हस्तांतरण व्यवहार नेफ्टच्या माध्यमातून केल्यास त्यावर 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सध्याला रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँका नेफ्टच्या माध्यमाच्या व्यवहारावर कोणतेही शुल्क आकारत नाहीत. आगामी काळात मात्र यावर शुल्क ग्राहकांना भरावे लागू शकते. याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो.
असे असणार शुल्क
10 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर 2.5 रुपये
10 हजार ते 1 लाख रुपये ………… 5 रुपये
1 लाख ते 2 लाख रुपये………….. 15 रुपये
2 लाख रु. अधिकच्या व्यवहारांवर 25 रुपये