Tarun Bharat

फेलिक्स ऍलिसिमेचे तिसरे जेतेपद

वृत्तसंस्था/ बेसिल (स्वीस)

कॅनडाच्या नवव्या मानांकित फेलिक्स ऑगेर ऍलिसिमेने रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील बेसिल खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविताना होल्गर रुनेचा पराभव केला.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ऍलिसिमेने रुनेचा 6-3, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. 2022 च्या टेनिस हंगामाअखेर एटीपीच्या मानांकन यादीत ऍलिसिमे नवव्या स्थानावर राहील, असा अंदाज आहे. टय़ुरिनमध्ये 13 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया एटीपीच्या फायनल्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऍलिसिमेचे प्रयत्न चालू आहेत. या स्पर्धेत एकूण आठ टेनिसपटूंना प्रवेश दिला जातो. ऍलिसिमेने 2022 च्या टेनिस हंगामात यापूर्वी फ्लोरेन्स आणि त्यानंतर अँटवेर्प स्पर्धा जिंकल्या होत्या.

Related Stories

विंडीजचा कसोटी संघ जाहीर

Amit Kulkarni

आयएसएल, आय लीग स्पर्धा एकाच केंद्रावर होणार,

Patil_p

ICC-World Cup 2022-जिंकलो… टिम इंडियाने पाकिस्तानवरील विजयाने साजरी केली दिवाळी

Kalyani Amanagi

आयपीएल फायनलची गीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Patil_p

हार्दिक पांड्या झाला बाबा; ट्विटरवर शेअर केला मुलाचा फोटो

Tousif Mujawar

गांगुलीप्रमाणे, धोनी-विराटने माझी मदत केली नाही

Patil_p