प्रतिनिधी /शिरोडा
देऊळवाडा बोरी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिरात गुरुवार 4 रोजी श्रावणी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी श्रींस अभिषेक, सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होईल. त्यात सुनील नाईक, सदानंद नाईक, विनोद नाईक, निलेश बोरकर व शेखर नाईक या कलाकारांचा सहभाग असेल. रात्री पालखी उत्सव, आरत्या व महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. सौ. व श्री. शामराव नाईक हे उत्सवाचे यजमानपद भूषविणार आहेत. भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे देवस्थानचे अध्यक्ष सिद्धेश पारपती यांनी कळविले आहे.