Tarun Bharat

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी एफआयबीचा छापा

Advertisements

एजंट्सनी निवासस्थानाला घेरले ः ट्रम्प यांचा प्रशासनावर आरोप

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयने माजी अध्यक्षांच्या आलिशान पॉम हाउस आणि मार-ए-लीगो या रिसॉर्टवर सोमवारी रात्री उशिरा (भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी पहाटे) छापा टाकला आहे. एफबीआयच्या अनेक एजंट्सनी ट्रम्प यांच्या निवासस्थानाला घेरून शोधमोहीम हाती घेतली आहे. ट्रम्प यांनीच या कारवाईची पुष्टी दिली आहे. पुढील निवडणूक लढविण्यापासून मला रोखण्याचा हा प्रयत्न असल्याचा ट्रम्प यांचा आरोप आहे.

फ्लोरिडा येथील माझ्या सुंदर निवासस्थानाला एफबीआयने ताब्यात घेतले आहे. येथे शोध घेतला जात असून एफबीआयचे एजंट्स उपस्थित असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तर एफबीआयच्या प्रवक्त्याने याप्रकरणी कुठलीही टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.

देशासाठी काळा अध्याय

अमेरिकेच्या माजी अध्यक्षासोबत असे कधीच घडलेले नाही. तपास यंत्रणांना सहकार्य करून देखील अशाप्रकारची कारवाई केली जात आहे. न्यायप्रणालीचा अस्त्र म्हणून गैरवापर करण्याचा हा प्रकार आहे. कट्टर लेफ्ट डेमोक्रेट्सचा हा हल्ला आहे. 2024 ची निवडणूक मी लढवू नये अशी त्यांची इच्छा असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

एफबीआयने ही कारवाई कुठल्याही नोटीसशिवाय केली आहे. एफबीआय एजट्स मार-ए-लीगो येथे पोहोचले तेव्हा तेथे ट्रम्प उपस्थित नव्हते असे त्यांच्या निकटवर्तीयांनी म्हटले आहे. ट्रम्प सध्या न्यूजर्सी येथे आहेत. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांच्या विरोधात संसदेतील हिंसेप्रकरणी तपास करणाऱया एका संसदीय समितीने एफबीआयने चौकशीला वेग द्यावा अशी टिप्पणी केली होती.

दस्तऐवज नेल्याचा आरोप

ट्रम्प यांनी मागील वर्षी व्हाइट हाउस सोडले होते, तेव्हा अनेक दस्तऐवजांना ते स्वतःसोबत घेऊन गेले होते.  परंतु आतापर्यंत या आरोपाची एफबीआयकडून कुठल्याही प्रकारची पुष्टी देण्यात आलेली नाही. अनेक मोठय़ा बॉक्समधील हे दस्तऐवज मार-ए-लीगो येथे नेण्यात आल्याचे बोलले जात आहे. तेव्हापासूनच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा ट्रम्प आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर नजर ठेवून होत्या.

फ्लश करत होते दस्तऐवज

अध्यक्षपदावर असताना अधिकृत दस्तऐवज फाडून ते फ्लश करण्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर काही महिन्यांपूर्वी झाला होता. ट्रम्प यांनी मोठय़ा प्रमाणावर कागद फ्लश केल्याने व्हाइट हाउसमधील टॉयलेटच जाम झाला होता. माजी अध्यक्षांच्या कागद फाडण्याच्या कृतीचीही चौकशी व्हावी अशी नॅशल आर्काइव्हची मागणी आहे.

निवडणूक लढण्याची इच्छा

पुन्हा एकदा अध्यक्षीय निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचे ट्रम्प यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यांच्या रिपब्लिकन पार्टीत त्यांना आव्हान देणारा तितका मातब्बर नेता नाही. परंतु 6 जानेवारी 2020 रोजी झालेल्या हिंसेप्रकरणी त्यांच्या विरोधात गंभीर आरोप आहेत. तसेच त्यांना महाभियोगाला सामोरे जावे लागले आहे.

Related Stories

पाकिस्तान गिलगिट, बाल्टीस्तानची स्वायत्तता रद्द करणार

datta jadhav

युरोपियन युनियनची युक्रेनियन नागरिकांना युरोपात 3 वर्षांपर्यंत राहण्याची परवानगी

Abhijeet Khandekar

ब्रिटनने 90 वर्षीय आजींना दिली कोरोनावरील पहिली लस

datta jadhav

महामार्गावर पायी चालणाऱयांना प्राधान्य

Patil_p

नेपाळच्या पंतप्रधानांना ‘सर्वोच्च’ दणका

Patil_p

रशियात 7 हजारांहून अधिक नवे रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!