Tarun Bharat

टीव्हीच्या आवाजावरून कडाक्याचे भांडण

Advertisements

सासू आणि सून यांची भांडणे आपल्या समाजात नवी नाहीत. एकमेकींना थपडा मारणे, शाब्दिक उद्धार करणे, वेळप्रसंगी घराबाहेर काढणे किंवा गंभीर जखमी करणे अशा घटनाही अगदीच होत नाहीत, असे नाही. तथापि, टीव्हीचा आवाज किती असावा, यावरून सासू-सुनांमध्ये भांडण होणे आणि ते एकमेकींची बोटे कापण्यापर्यंत जाणे ही घटना महाराष्ट्राच्या ठाणे जिल्हय़ात घडली आहे.

ठाणे जिल्हय़ातील अंबरनाथ येथे गेल्या सोमवारी सकाळी 32 वषीय सून विजया कुलकर्णी या आपल्या घरी टीव्ही पाहात होत्या. त्याचवेळी त्यांच्या सासूबाई वृषाली कुलकर्णी या भजन म्हणत होत्या. त्यांनी भजन संपेपर्यंत टीव्हीचा आवाज जरा कमी कर, असे आपल्या सुनेला सांगितले. मात्र, सुनेने आवाज कमी करण्याऐवजी अधिकच वाढवला. यामुळे नाराज झालेल्या सासूने उठून टीव्ही बंद करून टाकला.

यानंतर दोघींमध्ये कमालीचे भांडण झाले. संतप्त सुनेने सासूचा हात धरून तिची तीन बोटे कडकडून चावली. ती जवळपास तुटली आहेत. यामुळे सासू रक्तबंबाळ झाली. त्याचवेळी विजया यांचे पती मध्यस्थी करण्यासाठी येताच विजया यांनी त्यांच्याही मुस्काटात भडकावली. आता हे प्रकरण पोलिसात गेले आहे. सासूवर शस्त्रक्रिया करून बोटे ठिक करण्यात आली आहेत. सुनेच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून घरगुती हिंसाचार कायद्यातील तरतुदी त्यांच्या सुनेच्या विरोधात लावण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस चौकशी करत असून लवकरच पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

Related Stories

जगातील सर्वात महाग कलिंगड

Patil_p

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर : यंदा केवळ विश्वस्तांच्या उपस्थितीत दत्तजन्म सोहळा

Tousif Mujawar

मंडई म्हसोबा ट्रस्टतर्फे आजपासून विधायक व धार्मिक म्हसोबा उत्सव

Tousif Mujawar

दीड कोटीचे ‘बार्बी हाउस’

Patil_p

चहाविक्रीच्या कमाईतून 26 देशांची सैर

Patil_p

जगातील सर्वात उंच श्वान

Patil_p
error: Content is protected !!