FIFA World Cup 2022 : FIFA विश्वचषक 2022 मध्ये विजय मिळवून जपानने खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर गट ई मध्ये जर्मनीला धक्का दिला आहे. ताकुमा असानो हा या सामन्याचा नायक ठरला. सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार पुनरागमन करून जपानने जर्मनीला 2-1 असे नमवले.
या सामन्यात जर्मनीची सुरुवात चांगली झाली. जर्मनीचा स्टार मिडफिल्डर इल्के गुंडोगनने 33व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत हाफ टाईमला जपानवर 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. जर्मनीला हा गोल स्पॉट किक द्वारे मिळाला.
जर्मनीने आपली आघाडी पहील्या हाफपर्यंत कायम ठेवली. पण दुसऱ्या हाफमध्ये जपान आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. दुसऱ्या हाफमध्ये जपानने सामन्याचे चित्रच पालटले. जपानच्या डोअनने सामन्याच्या ७५ व्या मिनिटाला पहिला गोल केला आणि जर्मनीबरोबर १-१ अशी बरोबरी साधली. या पहील्या गोलमुळे आत्मविश्वास वाढलेल्या जपानच्या संघाने सामन्यावर शेवटपर्यंत आपली पकड ठेवली.
फुटबॉलचा दावेदार मानलेल्य़ा जर्मनीचा सामना जपानबरोबर एकतर्फी होईल असे वाटत असतानाच केलेल्या गोलमुळे जपानचा संघ चांगलाच फार्मात आला. त्यानंतर जपानच्या आसानोने 83 व्या मिनिटाला आणखी एक गोल डागून 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. जपानने दुसऱा गोल करून आघाडी मिळवल्यावर समर्थकांनी एकच जल्लोष केला. आपली आघाडी कायम ठेवण्यासाठी जपानने बचावात्मक पवित्रा घेतला. जपानच्या भक्कम बचावफळीमुळे जर्मनीला दुसरा गोल करता आला नाही.
जर्मनीचा मोठ्या विजेतेपदासाठीच्या सुरुवातीस हा सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याआधी 2018 च्या विश्वचषक स्पर्धेत मेक्सिकोकडून तर युरो 2020 मध्ये फ्रान्सकडून जर्मनीला पराभव पत्करावा लागला आहे.