Tarun Bharat

तिहार तुरुंगात दोन गटात सशस्त्र राडा, 15 कैदी जखमी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या दिल्लीतील तिहार (Tihar) तुरुंगात बुधवारी रात्री कैद्यांमध्ये सशस्त्र राडा झाला. यामध्ये 15 कैदी जखमी (15 injured) झाले असून, चार कैद्यांना दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात (deendayal upadhyay hospital) दाखल करण्यात आले. तर इतर कैद्यांवर कारागृह रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.

तिहार प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कारागृह प्रशासनाच्या कारभारावर संतप्त झालेल्या कैद्यांच्या दोन गटात बुधवारी रात्री राडा झाला. 15 कैद्यांनी धारदार शस्त्राने वार करून एकमेकांना गंभीर जखमी केले. तिहार कारागृह क्रमांक 8 आणि 9 मधील कैद्यांमध्ये हा राडा झाला. यामध्ये 15 कैदी जखमी झाले. काही कैद्यांना प्राथमिक उपचारानंतर पुन्हा कारागृहात हलवण्यात आले आहे. तर उर्वरित जखमी कैद्यांवर कारागृहातच उपचार सुरू आहेत. कारागृह प्रशासनाने या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Related Stories

अखिलेश यादव यांनी घेतला ‘अन्न संकल्प’

Patil_p

श्रीलंकेने देशव्यापी लॉकडाऊन उठवला

datta jadhav

इक्विटी म्युच्युअल फंडात 3 हजार कोटीची भर

Patil_p

माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी कामगारांसाठी केली पॅकेजची मागणी

Archana Banage

दिल्लीच्या परिस्थितीत सुधारणा; सोमवारी आढळले केवळ 65 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

के. व्ही. कामत यांना केंद्रात मंत्रिपद?

Patil_p