Tarun Bharat

वाकुर्डे बुद्रुक येथे शेतातील रस्त्याच्या वादावरून दोन गटात राडा

चार जण जखमी तर परस्परविरोधी पोलिसांत फिर्याद दाखल                     

Advertisements

शिराळा/प्रतिनिधी

जाधवमळा, वाकुर्डे बुद्रुक (ता.शिराळा) येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान शेतातील रस्त्यामधील दगड जेसीबी मशीन व ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने काढण्याच्या कारणावरून दोन गटात राडा झाला. यामध्ये चार जण जखमी झाले असून परस्परविरोधी शिराळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, वाकुर्डे बुद्रुक येथील वाकुर्डे बु! ते वाकुर्डे खुर्द येथील जाधव मळा नामक शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या कारणावरून शुक्रवारी शेतातील रस्ता करत असताना दोन गटात मारामारी झाली. या भांडणांमध्ये २५ हून अधिक महिला आणि पुरूष सहभागी होते. त्यामुळे या सर्वांनी मिळून एकमेकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. या घटनेसंदर्भात वनिता बाळासाहेब जाधव (रा मादळगांव, वाकुर्डे बुद्रुक) यांनी पोलिसात फिर्याद दिली असून मारहाणीत रघुनाथ ज्ञानु जाधव, आक्कासाहेब जाधव हे दोन जण जखमी झाले असून जिना बाळासाहेब जाधव यांच्यासह सुमारे अकरा जणांनी मारहाण केल्याची फिर्याद शिराळा पोलिसांत दिली आहे.

तर जिना बाळासाहेब जाधव यांच्यासह आणखी एक जण जखमी आहे. आम्हा सर्वांना वनिता जाधव व इतर १४ जणांनी माराहाण केल्याची तक्रार शिराळा पोलिसांत दिली आहे. सदर घटनेची नोंद शिराळा पोलिस ठाण्यात झाली असून परस्परविरोधी २५ जणांच्यावर तक्रारी दाखल झाल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष पाटील हे करीत आहेत.

Related Stories

कडेगाव तालुक्यात जुगार, मटका जोमात; पोलीस प्रशासन कोमात

Abhijeet Shinde

झेडपीमध्ये सत्ताधारी भाजपमध्ये गटबाजी उफाळली!

Abhijeet Shinde

विशेष लेखापरीक्षक लाखाची लाच घेताना अटकेत

Abhijeet Shinde

सांगली : वाळवा तालुक्यात पाच हजार कुटूंब, आठ हजार जनावरांचे स्थलांतर

Abhijeet Shinde

नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुवर्णा पवार

Sumit Tambekar

सांगली : पलूस येथे बैलगाडी बंदी उठवण्यासाठी शर्यतीप्रेमींनी काढला मोर्चा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!