गुहागर तालुका भाजपाच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार
प्रतिनिधी/गुहागर
३ सप्टेंबर २०२२ रोजी स्थानिक नेते व विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी गुहागर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमांत बोलताना ‘मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपा राज्यभरात दंगली घडवेल’असे अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे. हे विधान करताना त्यांनी त्यापुष्ट्यर्थ कोणतीही माहिती अथवा आधार दिलेला नाही, तर समाजातील दोन घटकांमध्ये जाणीव पूर्वक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने सदर विधान केले असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांचे वर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम १५३A. २९५A. ५०५IPC नुसार कारवाई करण्यात यावी. अशी तक्रार गुहागर पोलीस ठाणे व माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे गुहागर तालुका भाजपाच्यावतीने करण्यात आले आहे.