शैलेंद्र वेलिंगकर यांची मागणी
वार्ताहर /थिवी
अस्नोडा पाणी शुद्धीकरण प्रकल्प हा संपूर्ण बार्देश तसेच उत्तर गोव्यातील बहुतेक भागातील इतर आस्थापनांना पाणी पुरवठा करण्याचा मुख्य स्त्राsत असून याप्रकल्पातून पुरवठा करण्यात येणारे पाणी हे प्रदूषणयुक्त असून याचा परिणाम या परिसरातील लोकाच्या जिवितावर होणार असल्याने या प्रकल्पावर नियुक्त करण्यात आलेले अभियंता व कर्मचाऱयांवर गुन्हा नोंद करून कारवाई करावी अशी मागणी श्री परशुराम गोमंतक सेनेचे निमंत्रक शैलेंद्र सुभाष वेलिंगकर यांनी या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केली.
आज सायंकाळी श्री परशुराम गोमंतक सेनेचे शैलेंद्र वेलिंगकर, सुनील सांतइनेजकर, किथ फर्नांडिस, प्रसन्न पांगम व पृडेन्स नोरोन्हा यांनी अस्नोडा प्रकल्पाची पाहणी केली व याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, अस्नोडा पाणी शुद्धीकरण प्रकल्प हा पार नदीवर विसंबून असून या नदीतून पाणी खेचून अस्नोडा पाणी प्रकल्पातून शुद्धीकरण करून संपूर्ण बार्देश तालुका व उत्तर गोव्यातील काही भागात पुरवठा करण्यात येतो पण हे पाणी प्रदूषणयुक्त असून यामुळे या परिसरातील लोकांनी तसेच खासकरून लहान मुलांनी पिल्यास त्यांना कावीळ सारखे आजार पसरू शकतात.
या प्रकल्पावर सरकार लाखो रुपये खर्च करते पण येथील अभियंत्याच्या चुकीच्या अहवालामुळे सरकारपर्यंत खरी गोष्ट पोहोचत नाही. यासाठी खोटा अहवाल सादर करणाऱया अभियंता व इतर कर्मचाऱयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. आपल्याकडे या प्रकल्पाविषयी प्रदुषणयुक्त पाणी पुरवठा करण्यात येणारा खरा अहवाल असून सदर अहवाल आपण स्थानिक आमदारनीळकंठ हळर्णकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पर्यंत पोहचविणार असून दोषी अभियंता व कर्मचाऱयावर कारवाई करण्यास सांगणार असल्याचे सांगितले. तसेच गोव्याची म्हादई नदी सुद्धा कर्नाटकच्या घशात घातली असून आमच्याकडे असलेले इतर स्त्रोत आम्ही वाचविणे खूप गरजेचे आहे असे ते शेवटी म्हणाले.