File a defamation case against Sanjay Raut and arrest him immediately!
मालवण भाजपची पोलीस ठाण्यात मांडली आक्रमक भूमिका
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरून मानहानी केल्याबद्दल मराठी माणसांना फसवणारा, भ्रष्टाचारी, छत्रपती घराण्याचा अपमान करणारा वाचाळवीर संजय राऊत यांचा भारतीय जनता पार्टी मालवण तर्फे जाहीर निषेध नोंदवण्यात आला. राणे साहेबांवर सूडबुद्धीने मानहानी वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात यावा. वाचाळवीर राऊत यांचा बंदोबस्त करण्यात यावा. व तात्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी आंदोलन छेडेल. अशी आक्रमक भूमिका मांडत मालवण तालुका भाजपच्या वतीने भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांना निवेदन देण्यात आले. संजय राऊत यांना तात्काळ अटक झाली पाहिजे असे सांगत अशोक सावंत यांनी आक्रमक भूमिका मांडली.
मालवण | प्रतिनिधी