Tarun Bharat

घरपट्टी-पाणीपट्टी भरा, अन्यथा कारवाई

Advertisements

1 ऑक्टोबरपासून एक टक्का दंड आकारण्याचा कॅन्टोन्मेंटचा इशारा

प्रतिनिधी / बेळगाव

कॅन्टोन्मेंट परिसरातील असंख्य मालमत्ताधारकांनी घरपट्टी जमा केली नसल्याने त्यांना 30 सप्टेंबरपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. दि. 1 ऑक्टोबरपासून प्रतिमहिना एक टक्का दंड आकारला जाईल, असा इशारा नोटिसीद्वारे बजावण्यात आला आहे. तसेच पाणीपट्टी, गाळय़ांचे थकीत भाडे तातडीने भरावे, अन्यथा नळजोडणी तोडली जाईल, असाही इशारा दिला आहे.

कॅन्टोन्मेंट परिसरात 1200 मालमत्ता असून घरपट्टी भरण्यासाठी भरपूर मुदत दिली जाते. मात्र दिलेल्या मुदतीतही घरपट्टी भरली जात नाही. घरपट्टी भरण्यासाठी वेळोवेळी आवाहन केले जाते. तरीदेखील अनेक मालमत्ताधारकांनी घरपट्टी जमा केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत घरपट्टी भरण्यासाठी मालमत्ताधारकांना मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या वेळेत घरपट्टी न भरल्यास दि. 1 ऑक्टोबरपासून थकीत घरपट्टीवर प्रतिमहिना एक टक्का दंड आकारला जाणार आहे. अनेक मालमत्ताधारकांनी पाणीपट्टी व गाळेधारकांनी भाडे थकविले आहे. त्यामुळे नागरिकांना आणि गाळेधारकांनादेखील नोटीस बजावून 30 सप्टेंबरपर्यंत पाणीपट्टी व थकीत भाडे भरण्याचे आवाहन केले आहे.

वेळेत पाणीपट्टी न भरल्यास नळजोडणी तोडण्यात येईल व गाळेधारकांवर कॅन्टोन्मेंट ऍक्ट 2006 च्या 324 कलमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. मालमत्ताधारक, नळधारक आणि गाळेधारकांनी ई-छावणीच्या माध्यमातून 30 सप्टेंबरपर्यंत घरपट्टी, पाणीपट्टी आणि थकीत भाडे भरावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे पत्रक कॅन्टोन्मेंटने जाहीर केले आहे.

Related Stories

कंग्राळी खुर्द येथील महिला 15 दिवसांपासून बेपत्ता

Rohan_P

पहिले रेल्वे गेट येथील बॅरिकेड्स हटविण्यासाठी पुन्हा आंदोलन

Amit Kulkarni

शुक्रवारी जिल्हय़ात कोरोनाचे 7 नवे रुग्ण

Amit Kulkarni

शुभम शेळके यांना दोन्ही प्रकरणात जामीन

Amit Kulkarni

समादेवी गल्ली येथील रहिवाशाची आत्महत्या

Patil_p

शिक्षक बदलीसाठी जिल्हय़ात 2 हजार 927 अर्ज

Patil_p
error: Content is protected !!