प्रतिनिधी /बेळगाव
पिण्याच्या पाईपची दुरुस्ती करण्यासाठी गुडस्शेड रोडवर खोदाई करण्यात आली आहे. 15 दिवस हा खड्डा तसाच असून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दुरुस्ती होत नसल्यामुळे खड्डा न भरता तसाच सोडण्यात आला आहे. मात्र यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून अपघात घडण्याची शक्मयता आहे. तेव्हा तातडीने पाईपची दुरुस्ती करून खड्डा बुजवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
शास्त्राrनगर क्रॉस आणि गुडस्शेड रोडवर पिण्याच्या पाण्याची पाईप फुटली होती, तसेच पाणीपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. त्यामुळे दुरुस्त करण्यासाठी खोदाई केली आहे. मात्र बरेच दिवस उलटले तरी तो खड्डा तसाच ठेवण्यात आला आहे. रात्रीच्यावेळी खड्डा धोकादायक असून तातडीने दुरुस्ती करून बुजवावा, अशी मागणी होत आहे.