टायगर श्रॉफ स्वत:ची अॅक्शनदृश्यं अन् फिटनेससाठी ओळखला जातो. टायगर हा सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असतो. टायगरने स्वत:च्या कारकीर्दीत आतापर्यंत अनेक अॅक्शन फिल्म्स केल्या आहेत. सध्या तो स्वत:चा आगामी चित्रपट गणपत पार्ट 1 वरून चर्चेत आहे. टायगरने अलिकडेच याचे चित्रिकरण संपविले आहे. त्याने यासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट करत याला आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक चित्रपट संबोधिले आहे.
गणपत पार्ट 1 हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित हेणार आहे. या चित्रपटातील स्वत:चा लुक टायगरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टला अनेक कलाकारांनी प्रतिसाद दिला आहे. अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीने त्याच्या पोस्टला लाइक केले आहे.
गणपत या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. तर वासू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. टायगर आता स्वत:चा आगामी चित्रपट ‘रॅम्बो’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात भाग घेणार आहे. यानंतर तो अक्षय कुमारसोबत ‘बडे मियां, छोटे मियां’ चित्रपटात दिसून येणार आहे.