Tarun Bharat

‘कधी ईद कभी दिवाली’चे चित्रिकरण सुरू

पूजा हेगडेसोबत दिसून येणार सलमान खान

सलमान खानने स्वतःचा नवा चित्रपट कधी ईद कभी दिवालीचे चित्रिकरण सुरू केले आहे. सलमानने यासंबंधी माहिती देत स्वतःचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. साजिद नाडियाडवालाचा चित्रपट असलेल्या कभी ईद कभी दिवालीचे चित्रिकरण सध्या मुंबईत सुरू आहे. एक दिवस अगोदर पूजा हेगडेने देखील छायाचित्र शेअर करत याची पुष्टी दिली होती.

या चित्रपटात तेलगू अभिनेता वेंकटेश दग्गुबाती देखील दिसून येणार आहे. मुंबईतील एका विशेष सेटवर याचे चित्रिकरण करण्यात येत आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत असून यात मुख्य नायिका म्हणून पूजा हेगडे झळकणार आहे. पूजा हेगडेचा सलमानसोबतचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.

काही काळापूर्वीच यशराज बॅनरच्या टायगर 3 चित्रपटाचे चित्रिकरण सलमानने पूर्ण केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ दिसून येणार आहे. अलिकडेच पूजा हेगडेने सलमानशी संबंधित एक छायाचित्र शेअर केले होते. यात ती सलमानचे ब्रेसलेट दर्शविताना दिसून आली होती.

Related Stories

‘ओम – द बॅटल विदिन’मध्ये संजना सांघी

Patil_p

लव्हेबल केमिस्ट्री लवकरच ‘143’ चित्रपटातून सज्ज

Patil_p

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे निधन

Tousif Mujawar

5 ऑगस्टला झळकणार आलियाचा ‘डार्लिंग्स’

Patil_p

सुहाना, खुशी अन् इब्राहिमचे एकत्रित पदार्पण

Patil_p

हीरामंडी’मध्ये मनीषाची एंट्री

Patil_p