कियारा अन् कार्तिक आर्यनचा चित्रपट
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही दीर्घकाळापासून ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त होती. चाहते देखील तिच्या या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाल्याची माहिती कियाराने सोशल मीडियावर दिली आहे.
या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा एकत्र दिसून येणार आहेत. हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. कियाराने सोशल मीडियावर ‘सत्यप्रेम की कथा’च्या सेटवरील काही छायाचित्रे शेअर केली आहेत. यात ती कार्तिक आणि चित्रपटाच्या टीमसोबत दिसून येत आहे. चित्रिकरण पूर्ण झाल्याने टीमने सेटवर केक कापून आनंद व्यक्त केल्याचे छायाचित्रांमध्ये दिसून येते.
हा चित्रपट माझ्या मनाला भिडणारा आहे. या चित्रपटासाठीचा प्रवास मला कधीच विसरता येणार नाही. अत्यंत उत्तम कलाकार आणि टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझे सुदैव असल्याचे कियाराने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान अनेक मित्र जोडले गेले असून त्यांचा मी नेहमीच आदर करणार असल्याचे तिने म्हटले आहे. कियाराने चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विध्वंस आणि पूर्ण टीमचे आभार मानले आहेत.