वृत्तसंस्था/ ग्लॅस्गो
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या बिली जिन पिंग चषक सांघिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेमध्ये ऍलिसिया माँकच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने 1974 नंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. या स्पर्धेत गुरुवारी ब्रिटनने 41 वर्षानंतर पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठताना स्पेनचा व्हाईटवॉश केला होता. उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाने ब्रिटनचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरीत स्थान मिळवले. या स्पर्धेचे आतापर्यंत सातवेळा विजेतेपद मिळवाऱया ऑस्ट्रेलियन संघाला 2019 साली फ्रान्सकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली होती.
ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन यांच्यातील लढतीत सलामीच्या एकेरी सामन्यात सँडर्सने वॅटसनचा 6-4, 7-6(7-3) असा पराभव केला. त्यानंतर हॅरीट डर्टने पॉवोला वेडोसावर मात केली. दरम्यान अन्य एका सामन्यात डर्टने टॉमलेजोनॉविकवर 7-6(7-3), 6-2 अशी मात केली. दुहेरीच्या सामन्यात ऍलिसीया बार्नेट आणि निकोल्स यांना पराभव पत्करावा लागला. गेल्या वर्षी या स्पर्धेत अंतिम लढतीत स्वीसला रशियाकडून पराभव पत्करावा लागला होता. व्हिक्टोरिया गोलुबिकने मुचोवाचा 6-4, 6-4, बेलसिकने प्लिसकोवाचा 6-2, 7-6(8-6) असा पराभव केला.