वृत्तसंस्था/ न्युपोर्ट (अमेरिका)
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या हॉल ऑफ फेम एटीपी ग्रासकोर्ट पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेचा मॅक्झीम क्रेसी आणि कझाकस्थानचा ऍलेक्झांडर बुबलीक यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.
या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात क्रेसीने अमेरिकेच्या जॉन इस्नेरचा 6-2, 4-6, 6-3 तसेच दुसऱया उपांत्य सामन्यात कझाकस्थानच्या बुबलीकने ऑस्ट्रेलियाच्या जेसन क्युबलेरचा 6-3, 6-2 अशा सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. एटीपीच्या मानांकनात बुबलीक 42 व्या तर क्रेसी 41 व्या स्थानी आहेत. चालू वर्षीच्या टेनिस हंगामामध्ये क्रेसीने एटीपी टूरवरील स्पर्धेमध्ये तिसऱयांदा अंतिम फेरी गाठली असून तो आता एटीपी स्पर्धेतील पहिले जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.