वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी मास्टर्स वेस्टर्न आणि सदर्न महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत झेक प्रजासत्ताकची पेत्र क्विटोव्हा तसेच स्पेनची कॅरोलिन गार्सिया यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात झेकच्या क्विटोव्हाने अमेरिकेच्या मॅडिसन किजचे आव्हान 6-7(6-8), 6-4, 6-3 अशा सेटसमध्ये संपुष्टात आणत अंतिम फेरीत स्थान मिळविले. 2019 साली मॅडिसन किजने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. क्विटोव्हा आणि किज यांच्यातील हा सामना दोन तास 18 मिनिटे चालला होता. झेकच्या क्विटोव्हाचा या स्पर्धेत उपांत्य फेरीतील हा पहिला विजय आहे. 2012 आणि 2018 साली या स्पर्धेत क्विटोव्हाला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. दुसऱया उपांत्य सामन्यात कॅरोलिन गार्सियाने बेलारुसच्या साबलेन्काचा 6-2, 4-6, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. डब्ल्यूटीए टूरवरील 1000 स्पर्धेत गार्सियाने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे.