वृत्तसंस्था/ ऑकलंड
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या ऑकलंड खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या कॅमेरून नोरीने पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठताना जेनसेन ब्रुक्सबायचा पराभव केला. त्याचप्रमाणे फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केटने एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.
ब्रिटनच्या कॅमेरून नोरीने शुक्रवारी पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात जेनसेन बुक्सबायचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत अंतिम फेरीत स्थान मिळविले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही सामना नोरीने गमावलेला नाही. त्याचप्रमाणे फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केटला उपांत्यफेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या लिस्टेनीकडून पुढे चाल मिळाली. लिस्टेनीने दुखापतीमुळे उपांत्यफेरीचा सामना अर्धवट सोडला.