पणजी : आमदार दिगंबर कामत व मायकल लोबो यांच्या विरोधातील गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सादर केलेल्या अपात्रता याचिकेवर येत्या शुक्रवारी म्हणजे 17 मार्च रोजी सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर अंतिम सुनावणी होणार आहे. यापूर्वी सभापतींनी दोन्ही आमदारांना नोटीस जारी कऊन स्पष्टीकरण मागितले होते. पाटकर हे आमदार नसल्यामुळे त्यांना अपात्रता याचिका सादर करण्याचा अधिकार नसल्याने ती याचिका फेटाळून लावण्यात यावी असा दावा दोन्ही आमदारांनी आपल्या स्पष्टीकरणातून केला आहे. अपात्रता याचिका कोणीही दाखल कऊ शकतो, त्यासाठी आमदार असण्याची गरज नाही, असे म्हणणे पाटकर यांनी सभापतींसमोर मांडले आहे. कामत व लोबो या दोघांनी काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न चालवला असून त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका पाटकर यांनी ठेवून अपात्रता याचिका सादर केली होती. ऑगस्ट 2022 मध्ये त्यांनी याचिका दाखल कऊन दोन्ही आमदारांना अपात्र ठरवावे, असे नमूद केले होते. त्यास आता 8 महिने झाले असून अद्याप त्यावर सभापतींनी कोणताही निकाल दिलेला नाही. आता सभापती कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी अंतिम सुनावणी घेण्यात येणार असून त्यानंतर निकाल होणार आहे. निकाल नेमका कधी लागणार ते मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Previous Articleफोंडा उपजिल्हा इस्पितळात कोरोना तत्वाची पायमल्ली
Next Article आजपासून गडगडाटासह पावसाची शक्यता
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.