Tarun Bharat

मणिपूर-झारखंडमध्ये अंतिम लढत

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

येथील आंबेडकर स्टेडियमवर सुरू असलेल्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या 61 व्या सुब्रतो चषक आंतरशालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत इम्फाळ-मणिपूरचा वेनगोई सेकंडरी स्कूल आणि झारखंडच्या सेंट पॅट्रिक्स हायस्कूल संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात झारखंडच्या सेंट पॅट्रिक हायस्कूल गुमलाने हरियानाच्या जी.एस.एस.एस. अलकापुरा भिवानी हायस्कूलचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल पाचव्या मिनिटाला इलाझेरद लाक्राने केला. दुसऱया उपांत्य सामन्यात इम्फाळ-मणिपूरच्या वेनगोई हायर सेकंडरी स्कूलने बिहारच्या आरकेएस उच्च माध्यमिक सिवान हायस्कूलचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. विजयी संघातर्फे 17 व्या मिनिटाला होनीतेतने, 21 व्या मिनिटाला एल. मेनका आणि 49 व्या मिनिटाला टी. टोबीसेना यांनी गोल नोंदविले. पराभूत झालेल्या संघातर्फे एकमेव गोल 32 व्या मिनिटाला प्रियाने केला.

Related Stories

बीसीसीआयने राहुल जोहरींचा राजीनामा स्वीकारला

Patil_p

मॅथ्यू वेडला कसोटीतून डच्चू, टिम पेनकडे नेतृत्व कायम

Patil_p

रेल्वे मंत्रालयाकडून चानूला 2 कोटी, नोकरीत बढती

Patil_p

प्लेऑफचा चौथा संघ आज ठरणार, दिल्ली-मुंबई आमनेसामने

Patil_p

ते म्हणतात, 2011 वर्ल्डकप फायनल फिक्स होती!

Patil_p

हिटमॅनचे आणखी एक रेकॉर्ड

prashant_c
error: Content is protected !!