Tarun Bharat

साईराज वॉरियर्स-अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स यांच्यात आज अंतिम लढत

के. आर. शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित दुसऱया के. आर. शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱया क्वालिफायर सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने के. आर. शेट्टी किंग्स संघाचा 25 धावानी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू नरेंद्र मांगोरे (साईराज वॉरियर्स) याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसऱया क्वालिफायर सामन्यात के. आर. शेट्टी संघाने नाणेफेक जिंकून साईराज वॉरियर्सला प्रथम फलंदाजी दिल्यावर साईराज वॉरियर्स संघाने 20 षटकात 4 बाद 122 धावा केल्या. हबीब ताडपत्रीने 39, नरेंद्र मांगोरेने 25 चेंडूत 34, सुधन्वा कुलकर्णीने 28 धावा केल्या. के. आर. शेट्टी संघातर्फे यासिर नेहालने 13 धावात 2 तर डॉमनिक फर्नांडिसने 30 धावात 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी संघाचा डाव 18.1 षटकात सर्व बाद 97 धावात आटोपला. अंगदराज हित्तलमनीने 35, अमित यादवने 29, केतज कोल्हापुरेने 13 धावा केल्या. साईराज वॉरियर्सतर्फे शुभम गौंडाडकरने 16 धावात 3, ओंकार वेर्णेकरने 18 धावात 2, दीपक राक्षेने 13 धावात 2 तर नरेंद्र मांगोरेने 1 गडी बाद केला.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे गोपीनाथ हेगडे, सुरेश शट्टर, प्रकाश हेगडे, डॉ. विनायक कुंभार, डॉ. गोपाल कुंभार, हर्ष जॉन व प्रणय शेट्टी यांच्या हस्ते सामनावीर व सर्वाधिक षटकार नरेंद्र मांगोरे, इम्पॅक्ट खेळाडू यासिर निहाल, उत्कृष्ट झेल अभिषेक देसाई यांना चषक देवून गौरविण्यात आले.

गुरूवारी अंतिम सामना साईराज वॉरियर्स व अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स यांच्यात सकाळी 10 वा. खेळविण्यात येणार आहे. बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल बेनके, राजू शेठ, मिहीर पोतदार, निशिल पोतदार आदी उपस्थित राहणार आहेत

Related Stories

चोरी झालेली टू व्हीलर रेलनगर येथे सापडली

mithun mane

बेळगावसह 14 जिल्हय़ांमध्ये मुलींचे प्रमाण घटतेय!

Amit Kulkarni

निरोगी शरीर-आनंदी मन ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

Patil_p

लैला शुगर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु

Rohit Salunke

परिवहन कर्मचाऱयांच्या संपाचा तिढा अद्याप कायम

Amit Kulkarni

जिल्हय़ात 32 हजार 801 विद्यार्थ्यांचा पहिलीत प्रवेश

Patil_p