Tarun Bharat

केएलएस-संत मीरा यांच्यात आज अंतिम लढत

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

सार्वजनिक शिक्षण खाते व भारती विद्याभवन शानभाग स्कूल आयोजित टिळकवाडी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा संघाने जी. जी. चिटणीस संघाचा तर केएलएसने एम. क्ही. हेरवाडकर संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

लेले मैदानावर आयोजित या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सारिका पाटील, वाणी जोशी, संतोष दळवी, प्रवीण पाटील, सी. आर. पाटील, सोमशेखर हुद्दार, अर्जुन भेकणे, धनसिंग धनाजे, रामलिंग परिट व सोलोमन आदी मान्यवर उपस्थित होते.

टिळकवाडी विभागीय माध्यमिक शालेय स्पर्धेत 13 शालेय संघानी भाग घेतला. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत जी. जी. चिटणीसने गोमटेश हायस्कूलचा 1-0 तर  दुसऱया उपांत्यपूर्व सामन्यात संत मीरा संघाने ओरिएंटलचा 3-0 असा पराभव केला. तसेच एम. व्ही. हेरवाडकरने एम. आर. भंडारी संघाचा 1-0 तर चौथ्या उपांत्यपूर्व फेरीत केएलएसने मुक्तांगण संघाचा 3-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

उपांत्य सामन्यात संत मीरा संघाने जी. जी. चिटणीस संघाचा 1-0 असा पराभव केला. दुसऱया सत्रात 40 व्या मिनिटाला स्वयं काकतकरने एकमेव विजयी गोल नोंदवला. चिटणीस संघाला गोल करण्यात अपयश आले. दुसऱया उपांत्य सामन्यात केएलएस संघाने एम. व्ही. हेरवाडकर संघाचा 2-0 असा पराभव केला. पहिल्या सत्रात 16 व्या मिनिटाला शाकीब जागिरदारने पहिला गोल केला तर दुसऱया सत्रात दहाव्या मिनिटाला तन्मय पाटीलने गोल नेंदवला. अंतिम सामना गुरूवारी सकाळी 9 वा. केएलएस वि. संत मीरा यांच्यात खेळविण्यात येणार आहे.

error: Content is protected !!