Tarun Bharat

अखेर मालवणातील जलपर्यटनास एका दिवसापुरती मुभा

Advertisements

Finally, boating in Malvan is allowed for one day

अनधिकृत सागरी पर्यटनावर कारवाई करत बंदर विभागाने खळबळ उडवून दिल्यानंतर मंगळवारी दुपारी पर्यटन व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक बंदर अधिकारी कॕ. संदीप भुजबळ यांची भेट घेत आपली आणि आलेल्या पर्यटकांची बाजू मांडली. कागदपत्रांची पूर्ततेसाठी आवश्यक प्रस्ताव आम्ही सादर केलेत. पण प्रस्तावाना मान्यता मिळण्यास संबंधित विभागाकडून विलंब होत आहे. त्यामुळे बंदर विभागाने अचानक कारवाईचा बडगा उगारून पर्यटनाचा खोळंबा करू नये अशी विनंती पर्यटन व्यावसायिकांनी केली. त्यास बंदर विभागाने प्रतिसाद दिला. मात्र बंदर विभागाच्या पूर्ण देखरेखीखाली दुपारनंतर केवळ आजच्या दिवसापुरते पर्यटन सुरू राहील, असे कॕ. भुजबळ यांनी स्पष्ट करत बंदर विभागाची टीम समुद्रकिना-यावर तैनात केली. मात्र उद्यापासून ज्यांचाकडे सर्व कागदपत्रे पूर्ण असतील त्यांनाच जलपर्यटन कराता येईल असे बंदर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

मालवण / प्रतिनिधी

Related Stories

ते बिबट्याचे पिल्लू नसून ऊदमांजर…

Abhijeet Khandekar

राजापूरच्या पश्चिम किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन

Patil_p

कोविशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Tousif Mujawar

रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar

शाळेचं नाही तर…; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद

Archana Banage

राजापूर जवळेथर प्राथ. आरोग्य केंद्रातील डॉक्टर लाच घेताना जाळ्यात

Archana Banage
error: Content is protected !!