Tarun Bharat

अखेर विलीनीकरणाचे पत्र मिळाले

कॅन्टोन्मेंट वसाहत विलीनीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र : मनपाच्या निर्णयाकडे लक्ष

प्रतिनिधी /बेळगाव

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरी वसाहत महापालिकेत विलीन करण्याचा विचार संरक्षण खात्याने चालविला आहे. कर्नाटकात एकमेव असलेल्या बेळगाव कॅन्टोन्मेंट वसाहतीच्या विलीनीकरणाबाबत कोणतेच पत्र मिळाले नव्हते. मात्र अलीकडेच कॅन्टोन्मेंट वसाहत बेळगाव महापालिकेत विलीनीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. विलीनीकरणाबाबतचा निर्णय कळविण्याची सूचना केली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डला देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. तसेच कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी वसाहत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला आहे. याकरिता यापूर्वी उत्तराखंड, महाराष्ट्र, बिहार आदींसह देशातील विविध कॅन्टोन्मेंटच्या विलीनीकरणासाठी राज्य सरकारला पत्र पाठविले होते. मात्र कर्नाटकात एकमेव असलेल्या बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या विलीनीकरणाबाबत कोणतेच पत्र पाठविण्यात आले नव्हते. संरक्षण खात्याने राज्य प्रशासनाला 23 सप्टेंबर 2022 रोजी विलीनीकरणाबाबतचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे राज्य शासनाने नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून बेळगाव कॅन्टोन्मेंट नागरी वसाहतींचे महापालिकेत विलीनीकरण करण्याबाबतचे मत विचारले आहे. संरक्षण खात्याने पाठविलेल्या प्रस्तावानुसार

कॅन्टोन्मेंटची नागरी वसाहत स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीन करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेचे मत विचारण्यात आले असून विलीन करून घेण्याची तयारी असल्यास याबाबतचा प्रस्ताव राज्य शासन व कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांना कळविण्याची सूचना करण्यात आली आहे.

सदर पत्र नगर विकास प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी डीयूडीसीला पाठविले असून या आठवड्यात महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे. कॅन्टोन्मेंट नागरी वसाहत महापालिकेत विलीन करून घेण्याचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागणार आहे. त्याकरिता काही नियमावली व कोणकोणता परिसर हस्तांतर केला जाणार आहे, याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटची नागरी वसाहत महापालिका विलीन करून घेणार का? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

आविष्कार फौंडेशनचा शिक्षक पुरस्कार चिगुळकर यांना प्रदान

Amit Kulkarni

पेट्रोल-डिझेलची दरवाढ दररोज सुरूच

Amit Kulkarni

गंगूर फौंडेशनतर्फे संमोहन कार्यशाळा

Patil_p

लेकव्हय़ू हॉस्पिटलतर्फे जागतिक आरोग्य दिन साजरा

Amit Kulkarni

बेडकिहाळ येथे पत्रकार दिन साजरा

Patil_p

धर्मराज मल्टिपर्पज सोसायटीतर्फे 32 मण सुवर्णसिंहासनासाठी मदत

Amit Kulkarni