Tarun Bharat

अखेर रेल्वेस्थानकात शिल्पे बसविली

शिवप्रेमी-आंबेडकरप्रेमी कार्यकर्त्यांचा जल्लेष

बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प बसवावे, या मागणीसाठी रविवारी रात्री 1 ते 1.30 वाजेपर्यंत   आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला रात्री उशिरा यश आले असून अखेर या दोन्ही महापुऊषांची शिल्पे बसविण्यात आली. यामुळे उपस्थित शिवप्रेमी व आंबेडकरप्रेमी नागरिकांनी जल्लोष साजरा केला. बेळगाव रेल्वेस्थानकाचे नुतनीकरण झाल्यानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बेळगावच्या इतिहासात भर घालणाऱ्या घटना तसेच व्यक्ती यांची शिल्पे रेल्वेस्थानकात बसविण्यात आली. परंतु यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प नसल्याने मागील चार ते पाच महिन्यांपासून विविध संघटनांनी निवेदने दिली होती. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तयार केलेली शिल्पे गोडावूनमध्ये अडगळीत ठेवण्यात आली होती.

सायंकाळनंतर आंदोलनाला मोठी गर्दी

रविवारी सकाळी दलित संघटना व हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी शिल्प बसविण्यासाठी आंदोलन सुरू केले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी योग्य असा प्रतिसाद दिला नव्हता. सायंकाळनंतर आंदोलनाला मोठी गर्दी होत गेल्याने रात्री उशिरा तात्पुरत्या स्वऊपात शिल्प बसविण्याची परवानगी मिळाली. यानंतर फटाक्मयांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.

Related Stories

विभागीय क्रीडा स्पर्धेत नंदिहळ्ळी स्कूलची बाजी

Amit Kulkarni

अधिवेशनावेळी सर्वांची योग्यप्रकारे सोय करा!

Patil_p

बेळगाव विमानतळावर सुरक्षेची खबरदारी

Patil_p

बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर 16 सप्टेंबरपर्यंत रद्द

Amit Kulkarni

निवडणुकीच्या रणधुमाळीत लगीनघाई

Amit Kulkarni

नवीन रेशनकार्डच्या कामाला सुरुवात कधी?

Patil_p
error: Content is protected !!