सेन्सेक्स 659 अंकांनी मजबूत : बँक व वाहन कंपन्या नफ्यात
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवडय़ात भारतीय भांडवली बाजारात घसरणीला अखेर पूर्णविराम मिळाला असून यामध्ये गुरुवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स तब्बल 659.31 अंकांनी मजबूत होत बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. जागतिक पातळीवरील स्थितीमध्ये मजबूत वातावरण राहिल्याने दिवसभरात बँक, माहिती तंत्रज्ञान व वाहन क्षेत्रातील समभागात तेजी राहिली होती.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 659.31 अंकांनी वधारुन 1.12 टक्क्यांनी मजबूत होत निर्देशांक 59,688.22 वर बंद झाला आहे. यामध्ये काहीवेळ सेन्सेक्स 683.05 अंकांच्या उच्चांकावर राहिला होता. दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 174.35 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,798 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समध्ये गुरुवारच्या सत्रात टेक महिंद्रा, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, भारती एअरटेल, भारतीय स्टेट बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग प्रामुख्याने तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, एनटीपीसी, टायटन, नेस्ले आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग घसरणीत राहिले होते.
जागतिक घडामोडींमध्ये सध्या चर्चेत आलेल्या विषयांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई व वाढत्या चलनमूल्याच्या बाबत गुंतवणूकदारांमधील चिंतेचे ढग कमी होत असल्यामुळे जागतिक पातळीवरील मजबूत स्थितीचा फायदा देशातील भांडवली बाजाराला होत असल्याचे अभ्यासकांनी यावेळी सांगितले आहे.
उच्चांकी मूल्यांकनच्या व्यतिरिक्त विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय बाजारात गुंतवणूक करत आहेत. परिणामी बाजाराचा प्रवास सकारात्मक राहिला आहे. यासह आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की हे तेजीत होते. यासह हाँगकाँगचा हँगसेंग आणि चीनचा शांघाय कम्पोझिट घसरणीसह बंद झालेत.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- श्री सिमेंट्स…. 24458
- बीपीसीएल…….. 339
- ऍक्सिस बँक…….. 779
- टेक महिंद्रा……. 1089
- आयसीआयसीआय 898
- महिंद्रा अँड महिंद्रा 1321
- भारती एअरटेल… 769
- एसबीआय………. 544
- अल्ट्राटेक सिमेंट्स 6919
- बजाज फिनसर्व्ह 17382
- इंडसइंड बँक….. 1108
- एशियन पेंटस्…. 3450
- विप्रो…………….. 412
- एचडीएफसी लाईफ 584
- बजाज फायनान्स 7257
- इन्फोसिस…….. 1475
- आयशर मोटर्स… 3425
- आयटीसी……….. 329
- अदानी पोर्टस्…… 885
- कोटक महिंद्रा…. 1930
- ग्रेसीम…………. 1769
- एचडीएफसी बँक 1497
- एचडीएफसी….. 2449
- अपोलो हॉस्पिटल 4414
- लार्सन टुब्रो……. 1974
- टीसीएस………. 3169
- डॉ. रेड्डीज लॅब्ज. 4271
- सिप्ला…………. 1056
- रिलायन्स……… 2585
- ब्रिटानिया…….. 3672
- जेएसडब्ल्यू स्टील. 685
- हिरो मोटो कॉर्प. 2857
- मारुती सुझुकी… 8790
- सनफार्मा……….. 894
- बजाज ऑटो…… 3846
समभाग घसरलेल्या कंपन्या
- हिंडाल्को………… 420
- टाटा स्टील……… 105
- एसबीआय इन्शु. 1317
- कोल इंडिया…….. 236
- टाटा मोटर्स…….. 442
- डिव्हीज लॅब 3568