पणजी / प्रतिनिधी
अखेर पावसाने गोव्याला हुलकावणी दिली. पणजी वेधशाळेने पुढील दोन-तीन दिवसात गोव्यात सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता तथापि 1 जून रोजी सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस पडला नाही. त्याचबरोबर हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा दिलेला अंदाज मागे घेतला आहे. पुढील दोन दिवसात हवामान खात्याने एलो अलर्ट जारी केला होता तो अखेर मागे घेतला. यामुळे पावसाची शक्मयता केवळ एक जून रोजी पर्यंतच मर्यादित राहिली आणि एक जून रोजी पावसाने देखील वाकुल्या दाखवल्या.