Tarun Bharat

अखेर उद्योग इमारतीला मिळणार उद्वाहन!

Advertisements

चार वर्षांपासून बंद होती लिफ्ट, पुढील सहा महिन्यात कार्यान्वित

प्रतिनिधी/ पणजी

उद्योग खात्याच्या इमारतीतील नादुरुस्त लिफ्टमुळे तेथील कर्मचाऱयांच्या नशिबी आलेल्या हालअपेष्टा अखेर संपुष्टात येणार आहेत. गेल्या सुमारे चार वर्षांपासून ही लिफ्ट बंद असल्याने तेथे येणाऱया खास करून ज्येष्ठ, दिव्यांग व्यक्तींचे हाल होत होते. आता येत्या दि. 18 पासून नवीन लिफ्ट बसविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

एकुण चार माळ्यांच्या या इमारतीत माहिती खात्यासह आणखीही काही खात्यांची कार्यालये आहेत. तरी ही लिफ्ट उद्योग खात्याच्या अखत्यारित येत होती. त्यामुळे ती दुरुस्त करण्याची जबाबदारीही त्यांचीच होती. परंतु विविध तांत्रिक तसेच आर्थिक कारणांमुळे लिफ्टचे काम मार्गी लागत नव्हते. परिणामी तिसऱया किंवा चौथ्या मजल्यावर पायऱया चढून जाताना ज्येष्ठांची दमछाक होत होती. दिव्यांग व्यक्ती तर लिफ्टची स्थिती पाहून वर जाण्याऐवजी आल्या पावली परत जात होत्या.

लिफ्टच्या या परिस्थितीसाठी उद्योग खात्यावर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे अखेर लिफ्टचे काम हाती घेणे खात्यास भाग पडले. निविदा जारी केल्यानंतर सदर काम ओमेगा इलेव्हेटर्स या कंपनीस देण्यात आले असून 18 ऑगस्टपासून काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या लिफ्टसाठी सुमारे 12 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून पुढील सहा महिन्यांच्या आत लिफ्ट कार्यान्वित करावी, असे सांगण्यात आले आहे.

Related Stories

तमिळ राजकारणात ‘सुपरस्टार’चा प्रवेश

Patil_p

नेजल लसीच्या चाचण्यांना अनुमती

Patil_p

माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

जमात-ए-इस्लामी विरोधात एनआयएचे छापे

Amit Kulkarni

‘एम्स’मधील 35 डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात

Patil_p

दिल्ली : महाराष्ट्र सदनातील राज्यपालांच्या खोलीला आग

datta jadhav
error: Content is protected !!