सेन्सेक्स 652 अंकांनी कोसळला ः इन्फोसिस, टीसीएस नफ्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय भांडवली बाजारातील चालू आठवडय़ातील तेजीला अखेरच्या दिवशी शुक्रवारी विराम मिळाला आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स जवळपास 652 अंकांनी कोसळला आहे. जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे नफावसुली झाल्याने सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने आठवडय़ाच्या अंतिम दिवशी शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्स 651.85 अंकांनी प्रभावीत होत 1.08 टक्क्यांच्या नुकसानीसह निर्देशांक 59,646.15 बंद झाले. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 198.05 अंकांनी घसरुन निर्देशांक 17,758.45 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील मुख्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टाटा स्टील, भारतीय स्टेट बँक, मारुती सुझुकी, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये लार्सन ऍण्ड टुब्रो, इन्फोसिस आणि टीसीएस यांचे समभाग मात्र नफा कमाईत राहिल्याचे दिसून आले.
जागतिक घडामोडींचा प्रभाव
आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि जपानचा निक्की यांचे निर्देशांक नुकसानीत राहिले होते. तर हाँगकाँगचा हँगसेंग हा लाभात राहिला होता.
जागतिक पातळीवरील नफावसुलीचा प्रभाव पडल्याने व्याजदरांमधील वृद्धीमुळे बाजारात नकारात्मक वातावरण राहिले होते. यासोबतच निर्देशांकामध्ये मजबूत हिस्सेदारी ठेवण्यासाठी कंपन्यांच्या समभागात घसरण राहिली होती. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.38 टक्क्यांच्या घसरणीसह 95.25 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
यावेळी विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीनंतर जवळपास 1,706 कोटी रुपये किमतीच्या समभागांची विक्री केल्याची नोंद करण्यात आली आहे.