कणकुंबी : चिगुळे रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर चिगुळे ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. कणकुंबी ते चिगुळे हे 5 किलोमीटर अंतर असून त्यापैकी अडीच किलोमीटर रस्त्याची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. गेली चार-पाच वर्षे चिगुळे ग्रामस्थ खराब रस्त्यामुळे वैतागून गेले आहेत. 2023 मध्ये झालेल्या कणकुंबी, चिगुळे श्री माउलीदेवी यात्रोत्सवापूर्वी रस्ता करण्यात यावा यासाठी अनेकवेळा अर्जविनंत्या करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यात्रेपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण होईल या आशेने चिगुळे ग्रामस्थ होते. परंतु तत्कालीन आमदारांनी चिगुळे नागरिकांच्या आशेची निराशा केली. खराब रस्त्यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी शनिवार दि. 27 जुलै रोजी श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती केली. यावेळी चिगुळे गावातील नागरिकांनी अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील खड्डे दगड माती घालून बुजवण्यात आले. तसेच काही ठिकाणी गटारींअभावी पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे गटारांची देखील दुरुस्ती करण्यात आली. प्रशासन निद्रिस्त अवस्थेत असल्याने अखेर ग्रामस्थांनाच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रस्त्यावर उतरावे लागले.
Previous Articleआरपीडी कॉर्नरवर ड्रेनेज गळती
Next Article सुळगा (ये.) रस्त्याची दयनीय अवस्था
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.