प्रतिनिधी / बेळगाव – बेळगावी-पणजी NH748 (NH4A) या बहुचर्चित खानापूर-अनमोड मार्गाचे काम अखेर सोमवार पासून पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाच्या स्थगितीमुळे आणि कोविड लॉकडाऊन कंत्राटदाराणे नुकसानीचा हवाला देत, 52.300 किमी लांबीचे काम नवीन कंत्राटदार देण्यात आले. 2019 मध्ये बेंगळुरू येथील पर्यावरणवाद्यांनी उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे NH4A च्या दुपदरीकरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्वीच्या कंत्राटदारांनी विलंब केला होता.
तथापि, मार्च 2021 मध्ये, बेळगाव ते गोवा सीमेपर्यंतच्या रुंदीकरणासाठी अगोदर ग्रीन क्लिअरन्स मिळणे NHAI साठी बंधनकारक नाही, असे सांगून, कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती रद्द केली होती.
या मार्गाचे काम पुन्हा सुरू झाल्याने गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.