प्रतिनिधी /बेळगाव
रघुनाथ पेठ अनगोळ येथे कोसळलेल्या इमारतीतील दोन्ही कुटुंबांना अनगोळ येथील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पहिल्या मजल्यावरील शितल हुंचीकट्टी आणि खाली राहणाऱया कोप्पद कुटुंबीयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना राहण्यासाठी घर नाही. खाण्यासाठी अन्नधान्य नाही. झोपण्यासाठी अंथरुण पांघरूण नाही, की अंगावर घालण्यासाठी कपडेलत्ते नाहीत. जे कांही होते ते सर्व कोसळलेल्या इमारतीतील मातीत गेले. त्यामुळे त्यांच्या संसारासाठी तातडीने प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केली.