प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे गरजू विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य करणारा ‘सहाय्यम्’ हा कार्यक्रम आयएमईआर सभागृहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे उपस्थित होते.
प्रारंभी क्लबचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी यांनी स्वागत केले. रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामने 65 मुलींना दत्तक घेतले असून त्यांना अंदाजे 2 लाख 75 हजारांची शिष्यवृत्ती दिली आहे. 101 विद्यार्थ्यांना 4 लाख 17 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. या शिवाय एसएसएलसीमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांची सेवा लक्षात घेऊन दहा शिक्षकांना गौरविण्यात आले.
या दोन्ही उपक्रमांचे इव्हेंट चेअरमन म्हणून केतन, अष्टेकर, प्रसाद कट्टी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले. विजय पाटील यांनी आभार मानले. या उपक्रमासाठी करिअर पॉईंटचे संचालक भालचंद्र बाली तसेच डॉ. अरविंद कुलकर्णी व अनेक देणगीदारांनी अर्थसाहाय्य केले.