नवी दिल्ली
इलेक्ट्रिकल केबल निर्माती कंपनी फिनोलेक्स केबल्स आगामी काळामध्ये 10 ट्रिलीयन इतका खर्च भांडवलाच्या स्वरुपामध्ये करणार असल्याची माहिती आहे. वर्षाच्या तुलनेमध्ये पाहता भांडवल खर्चामध्ये 33 टक्के इतकी वाढ केली जाणार आहे. पायाभूत सुविधांसह गृहबांधणी प्रकल्पांच्या विकासासोबत स्मार्ट सिटी प्रकल्प तसेच मेट्रो रेल्वेचे होणारे प्रकल्प हे सर्व पाहता फिनोलेक्स कंपनीलाही यामध्ये योगदान देणे आगामी काळात शक्य होणार आहे.