ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दिप्ती भारद्वाज यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राऊत यांनी महिलांचा अवमान केल्याचा, तसेच अपशब्द वापरल्याचा आरोप होता. त्यावरुन दिल्लीतील पोलीस ठाण्यात राऊत यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
यावर बोलताना राऊत म्हणाले, मुलाखतीदरम्यान मी वापरलेल्या शब्दाचा अर्थ मूर्ख असा होतो. शब्दकोशांमध्ये त्या शब्दाचा अर्थ असून, त्या शब्दकोशांना सरकारची मान्यता आहे. तरीदेखील माझ्यावर एफआरआर दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे सूडभावना आणि माझा आवाज दाबण्यासाठी आहे. मी सरळमार्गी असल्याने आजपर्यंत ईडी, आयकर, सीबीआय माझ्याजवळ पोहचले नाहीत. त्यामुळे मला वेगळ्या मार्गाने त्रास देऊन माझ्या पक्षाच बदनामी करण्यासाठी भाजपच्या लोकांनी ही तक्रार केली आहे.