Tarun Bharat

हिंदू देवस्थान जमीन घोटाळा: भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम/तरुण भारत

हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर (Hindu temple land scam) हस्तांतरण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांच्यासह त्यांची पत्नी प्राजक्ता धस, भाऊ देविदास धस, मनोज रत्नपारखी, अस्लम नवाब खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

दरम्यान, आमदार सुरेश धस यांच्याविरोधात हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील आठ देवस्थानाच्या जमिनीचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशाने सुरेश धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.

बीड (beed) जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल करून चौकशी करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे पाठपुरावा करत आहेत. याबाबत खाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने १८ ऑक्टोबर रोजी राम खाडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानं आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे 13 (1) (अ) (ब), 13 (2) I p c 465, 468, 471, 120 ब, 109 नुसार आष्टी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे.

Related Stories

कॅट शो पहाण्यासाठी बालचमुंची मोठी गर्दी

Abhijeet Khandekar

श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यातही गुन्हा

datta jadhav

बेकायदा पिस्टलसह कराड तालुक्यातील दोघे जेरबंद

Patil_p

दिल्लीत 15 ऑगस्टच्या अगोदर ड्रोन हल्ल्याची शक्यता

Tousif Mujawar

उत्तराखंड : भाजप आमदार विनोद चमोली कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

कसबे डिग्रज नळ पाणीपुरवठा योजनेस मान्यता

Abhijeet Khandekar