Tarun Bharat

आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ओवैसी आणि स्वामी नरसिंहानंदांवर गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम/तरुण भारत

नुपूर शर्मांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही अनेकांनी चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. त्यांच्यावर आता दिल्ली पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. नुपूर शर्मासह आता पर्यंत ९ जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये आता असदुद्दीन ओवैसी (AIMIM chief Asaduddin Owaisi) आणि स्वामी यती नरसिंहानंद यांचा समावेश आहे.

नेत्यांच्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याची पोलिसांनी चांगलीच दखल घेतली असून भडकाऊ वक्तव्य आणि सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणारे संदेश पसरवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (AIMIM chief Asaduddin Owaisi) आणि स्वामी यती नरसिंहानंद (Swami Yati Narasimhananda) यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी (Hate Speach) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यासह आत्तापर्यंत ९ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांच्या सुत्रांच्या माहितीनुसार, समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत वातावरण बिघडवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांची कडक कारवाई सुरु आहे. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यासह नऊ जणांवर कठोर कारवाई केल्यानंतर आता एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी आणि स्वामी नरलसिंहानंद यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात द्वेषपूर्ण मेसेज पसरवणे, खोटी आणि पुष्टी नसलेल्या बातम्या पसरवणे, धार्मिक सलोख बिघडवणे आणि इतर अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, नुपूर शर्मा, नवीन कुमार जिंदाल, शादाब चौहान, सबा नक्वी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुल रहमान, गुलजार अन्सारी, अनिल कुमार मीना आणि पूजा शकुन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. IFSC पोलिस उपायुक्त केपीएस मल्होत्रा ​यांनी सांगितले की, विविध धर्माच्या लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे

Related Stories

गडचिरोलीत पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, जवान जखमी

datta jadhav

पंजाबमध्ये नकोत राजकीय प्रयोग

Patil_p

पंजाबमध्ये दिवसभरात 402 नवे कोरोना रुग्ण; 16 मृत्यू

Tousif Mujawar

12 आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानिक

datta jadhav

भारतीयांची उंची होतेय कमी

Rohit Salunke

राज्य सरकारची नवी नियमावली जारी; दुकानं फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहणार

Archana Banage