Tarun Bharat

सांताक्रूझमधील LIC कार्यालयाला भीषण आग

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईच्या सांताक्रूझमधील LIC कार्यालयाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली असून, आगीने उग्र रुप धारण केले आहे. परिसरात मोठय़ा प्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाडय़ा दाखल असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आज सकाळी सातच्या सुमारास LIC च्या या इमारतीला आग लागली. सॅलरी सेव्हिंग स्किम हा विभाग आगीच्या भक्षस्थानी पडला आहे. सर्व संगणक, फाईल्स आणि फर्निचर जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 8 गाडय़ा दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Related Stories

सिव्हील जिल्हा कोरोनामुक्त करतंय की, कोराना बाधित करतंय…

Patil_p

पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नका;कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Abhijeet Khandekar

जग चिंतेत मात्र चीनने तालिबान पुढे केला मैत्रीचा हात

Archana Banage

प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये

Archana Banage

येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार ; GPS यंत्रणा बसविणार : नितीन गडकरी

Tousif Mujawar

… तर 2 एप्रिलला लॉकडाऊन लावावा लागेल : अजित पवार

Tousif Mujawar