Tarun Bharat

लेवाना हॉटेलमध्ये अग्नितांडव; खिडकीच्या काचा फोडून लोकांना काढलं जातंय बाहेर

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Fire breaks out at Levana Hotel in Lucknow लखनऊमधील लेवाना हॉटेलला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली आहे. लखनऊच्या हजरतगंज भागात हे हॉटेल आहे. हॉटेलच्या खोल्यांमध्ये अनेक जण अडकले असून, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोलीसदलाकडूनही बचावकार्य सुरू आहे. आगीनंतर मोठय़ा प्रमाणात धूर झाल्याने खिडकीच्या काचा फोडून लोकांना बाहेर काढलं जात आहे. आतापर्यंत 13 लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर दोन जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.

लखनऊमधील हजरतगंज या उच्चभ्रू परिसरात हे हॉटेल आहे. हॉटेलजवळ हजरतगंज मेट्रो स्टेशन देखील आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये लोकांची गर्दी असते. आज सकाळी या हॉटेलला अचानक आग लागली. त्यानंतर क्षणार्धात आगीचे उग्र रुप धारण केले. आगीमुळे धुराचे लोट हॉटेलमध्ये पसरले. त्यामुळे हॉटेल्सच्या रुममध्ये असलेले अनेक जण गुदमले. त्यामुळे काहीजण बेशुद्ध पडले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या डझनभर गाडय़ा दाखल असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत.

हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना खिडक्या तोडून बाहेर काढण्यात येत आहे. या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर धुराच्या लोटामुळे गुदमरुन बेशुद्ध झालेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या आहेत.

Related Stories

ऑलिम्पिक तिकीट मिळवलेला कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल

Archana Banage

जीवन विमा करविणेच उत्तम!

Patil_p

लुधियाना कोर्ट हादरले

Amit Kulkarni

बजेट 2020 : एलआयसीमधील भागीदारी केंद्र सरकार विकणार

prashant_c

अमेरिका भारताचा खरा मित्र : डोनाल्ड ट्रम्प

tarunbharat

तेजबहादुरची याचिका फेटाळली

Patil_p