Fire damage to house at Wirey
वायरी टिकम शाळेनजीक श्रीकृष्ण वसंत मणचेकर यांच्या घराला बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास आग लागून मोठी हानी झाली. घरातील साहित्य, कपडे, मासेमारीचे साहित्य, हातगाडी, भांडीकुंडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मालवण नगरपालिकेचा बंब घटनास्थळी दाखल झाला होता. तत्पूर्वी मणचेकर कुटुंबियांनी स्थानिकांच्या मदतीने पाण्याचा मारा करून आग ब-यापैकी आटोक्यात आणली होती.
मालवण / प्रतिनिधी