Tarun Bharat

4 हजार वर्षांपासून पेटतेय आग

लँड ऑफ फायर अशी ओळख

आशिया आणि युरोपदरम्यान वसलेल्या एका देशात मागील 4 हजार वर्षांपासून एका ठिकाणी सातत्याने आग पेटत आहे. या आगीला हिमवृष्टी तसेच मुसळधार पाऊसही विझवू शकलेला नाही. ही आग पर्वताच्या पायथ्यात 10 मीटर भागात फैलावलेली आहे. या पर्वताला स्थानिक भाषेत यानर डाग म्हटले जाते, याचा अर्थ पेटणारा पर्वता असा होतो. हा पर्वत अझरबैजानच्या अबशेरोन भागामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येत पर्यटक या पेटणाऱया पर्वताला पाहण्यासाठी अबशेरोनमध्ये येत असतात.

अझरबैजान नैसर्गिक वायूने समृद्ध देश आहे. अशाप्रकारची आग याचाच एक साइडइफेक्ट आहे. हा वायू कधीकधी पृष्ठभागावर येत असतो आणि त्यामुळे आग लागते. अझरबैजानच्या अनेक भागांमध्ये हा प्रकार घडत असतो, याचमुळे अझरबैजानला लँड ऑफ फायर म्हटले जाते. पृष्ठभागावर होणारी वायू गळती समाप्त झाल्यावर ही आग आपोआप विझत असते. परंतु यानर डागप्रकरणी असे आतापर्यंत घडलेले नाही. यानर डाग मागील अनेक शतकांपासून अझरबैजानच्या लोकांना आकर्षित आणि भयभीत करत आहे.

मार्को पोलोकडून उल्लेख

या ठिकाणच्या रहस्यमय घटनांचा उल्लेख प्रसिद्ध संशोधक मार्को पोलो यांनी केला आहे. 13 व्या शतकात मार्को पोलो या भागात पोहोचले होते. अनेक अन्य रेशीम व्यापाऱयांनीही आगीच्या ज्वाळांचा उल्लेख केला आहे, हे व्यापारी अझरबैजानमार्गे अन्य देशांसाठी प्रवास करायचे. त्याकाळी अझरबैजानची ओळख आगीचा देश म्हणून होती. त्या काळात अझरबैजानच्या भूगर्भात असलेल्या नैसर्गिक वायुबद्दल कुणालाच कल्पना नव्हती. तेव्हा लोक याला एक रहस्यमय घटना मानायचे. मागील काही दशकांमध्ये अझरबैजानमध्ये असलेल्या नैसर्गिक वायूच्या साठय़ांबद्दल माहिती समोर आली आहे.

पारशी धर्म अन् अझरबैजान

अझरबैजानच्या रहस्यमय आगीने पारशी धर्मात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पारशी धर्माचा उदय इराणमध्ये झाला असला तरीही हा धर्म पहिल्या सहस्त्रकात अझरबैजानमध्ये प्रसारित झाला. पारशी धर्मासाठी आग ही मनुष्य आणि अलौकिक जगामधील महत्त्वाचा दुवा आहे. शुद्धीकरण, जीवनदायी आणि पूजेचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे.

Related Stories

रेल्वेतील स्फोटात पाकमध्ये दोघे ठार

Amit Kulkarni

UAE कडून मंगळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण

datta jadhav

सहारा वाळवंटात मिळाला 4.5 अब्ज वर्षे जुना दगड

Amit Kulkarni

ट्रम्प यांच्या नावे व्हाईट हाऊसमध्ये विष पार्सल

datta jadhav

गाझावरील हल्ल्यात एपीची इमारत उध्वस्त

Patil_p

कोरोना नियमांचे उल्लंघन, नॉर्वेच्या पंतप्रधानांना 1.70 लाखांचा दंड

datta jadhav