Tarun Bharat

पेडणे मामलेदार कार्यालयाच्या इलेक्ट्रिक पॅनलला आग

Advertisements

अग्निशामक दलाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

प्रतिनिधी /पेडणे 

 पेडणे मामलेदार कार्यालयात विजेच्या पॅनल बोर्डला रविवारी पहाटे 5.15 वा.  आग लागण्याची घटना घडली. यामुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले. जवळच असलेल्या अग्निशामक दलाच्या कार्यालयाच्या लक्षात आल्यामुळे जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग त्वरित नियंत्रणात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

 मोठी घटना होण्यापूर्वी तात्काळ अग्निशामक दलाचे साहायक अधिकारी आणि जवान यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठी दुर्घटना होण्यापासून, मामलेदार व सगळी कार्यालयेही वाचवण्यात यश मिळवले. मामलेदार कार्यालयाच्या बाहेर असलेल्या विजेच्या पॅनल बोर्डला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागण्याची घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

साहाय्यक अधिकारी सुनील देसाई, हवालदार विठ्ठल परब, हवालदार फटू परब, जवान राजेश परब, अमोल परब, अमित सावळ मयूर नाईक, यशवंत नाईक यांनी चांगली कामगिरी करत आग विझविली.

Related Stories

काँग्रेसला मतमोजणीपूर्वीच स्वतःची हार मान्य

Amit Kulkarni

तळपण पुलाजवळ कारला अपघात

Amit Kulkarni

आयडीसी-आयटीआय अंतर्गत 42 कोर्स सुरु करणार

Amit Kulkarni

सांगोल्डा माजी सरपंच अविनाश नाईक यांचा आज वाढदिवस

Amit Kulkarni

गोव्यातील प्रवासी बस वाहतुकीच्या प्रश्नावर तोडग्यासाठी पुन्हा प्रयत्न होणार, बस मालक संघटनेने घेतली वाहतुकमंत्र्यांची भेट

Omkar B

दिवाळी सणासाठी चावडी बाजार फुलला

Amit Kulkarni
error: Content is protected !!