Tarun Bharat

यंत्रमानवाच्या साहाय्याने अग्निशमन

इमारती किंवा अन्य ठिकाणी लागलेली आग विझविणे हे कौशल्याचे तसेच धोक्मयाचे काम आहे. कित्येकदा आग विझविणारे कर्मचारीच या आगीची शिकार बनतात. त्यामुळे यंत्रमानवाच्या साहाय्याने आग विझविण्याचे तंत्रज्ञान प्रगत पाश्चात्य देशांमध्ये विकसित झाले आहे. भारतही यात मागे नाही. दिल्ली सरकारने आपल्या अग्निशमन दलामध्ये अशा दोन यंत्रमानवांचा समावेश केला आहे.

दिल्ली ही अनधिकृत बांधकामांची राजधानी समजली जाते. या शहरातील 60 टक्क्मयांहून अधिक बांधकामे अनधिकृत असल्याचे सरकारी आकडेवारीच सांगते. ही अनधिकृत बांधकामे अतिशय कमी जागेत केलेली असल्याने रस्तेही कमालीचे अरुंद असतात. अशावेळी अशा अवैध वस्त्यांमधील आतील भागात आग लागल्यास ती विझविणे जवळपास अशक्मय असते. आग विझवण्याचा बंब जाण्याइतका रस्ताही मोठा नसतो. अशावेळी यंत्रमानवांचा उपयोग महत्त्वाचा ठरतो.

Advertisements

आग विझवणारी गाडी आगीच्या जवळ जाऊ शकत नसेल तर दुरून प्रचंड दाबाने पाण्याचा फवारा सोडावा लागतो. हे काम करण्यासाठी यंत्रमानव अग्निशमन कर्मचाऱयांपेक्षाही अधिक उपयोगी ठरतात, असे अनुभवास आले आहे. केवळ पाणीच नव्हे तर विशिष्ट प्रकारचा रासायनिक फेस आगीवर सोडून ती विझवण्याचे कामही हे यंत्रमानव करतात. ज्या ठिकाणी पाण्याचा पाईप जाऊ शकत नाही, तेथे अशा फेसाच्या साहाय्याने अत्यंत अरुंद जागेत जाऊनही आग विझवता येते. अशाप्रकारे दिल्ली हे अग्निशमनासाठी यंत्रमानव उपयोगात आणणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. हा यंत्रमानव 300 मीटर अंतरावरून चालवता येतो. याच्यावर उष्णता, धूर किंवा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम होत नाही. उंच इमारती, कारखाने, भूमिगत स्थाने आदी कोणत्याही ठिकाणी आग विझविण्याचे काम तो सहजगत्या करू शकतो. त्याचे इंजीन 140 ते 160 अश्वशक्तीचे असल्याने दुरून आग विझविण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. तसेच तो आपल्या साधनसामग्रीसह ताशी 4 किलोमीटर वेगाने धावू शकतो. खिडकी आणि दरवाजा तोडून आतून आग विझविण्याचीही त्याची क्षमता आहे. त्याच्या उपयोगामुळे अग्निशमन कर्मचाऱयांची संभाव्य जीवितहानी टाळता येते.

Related Stories

‘नंदीग्राम’प्रकरणी सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर

Amit Kulkarni

एस.एन. ब्रह्मण्यन यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

Abhijeet Shinde

देशात राहणार केवळ पाच सरकारी बँका

datta jadhav

भारतात मागील 24 तासात 28,701 नवे कोरोना रुग्ण, 500 मृत्यू

datta jadhav

राजीव गांधी फौंडेशनवर भाजपचे गंभीर आरोप

Patil_p

राजस्थान : जयपूर विमानतळावर 14 प्रवाशांकडून 32 किलो सोने जप्त

Rohan_P
error: Content is protected !!