Tarun Bharat

अमेरिकेत 3 ठिकाणी गोळीबार, 11 ठार

मृतांमध्ये दोन भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश ः कॅलिफोर्निया, शिकागो, आयोवामध्ये घटना

@ वृत्तसंस्था / शिकागो

अमेरिकेत 12 तासांच्या कालावधीत गोळीबाराच्या 3 घटना घडल्या असून यात 2 भारतीय विद्यार्थ्यांसमवेत 11 जणांना जीव गमवावा लागला आहे. गोळीबाराची पहिली घटना कॅलिफोर्नियात झाली असून तेथे 7 ठार झाले आहेत. शिकागो येथील गोळीबारात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक भारतीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. मृत विद्यार्थी हे आंध्रप्रदेश आणि तेलंगणाचे होते. हे भारतीय विद्यार्थी 10 दिवसांपूर्वी शिक्षणासाठी अमेरिकेत पोहोचले होते.

बंदुकधाऱयाने हाफ मून बे भागातील दोन ठिकाणी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या गोळीबाराप्रकरणी 67 वर्षीय जहाओ चुनली नावाच्या संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे शेरिफकडून सांगण्यात आले. संशयित आरोपी पार्किंग लॉटमध्ये स्वतःच्या कारमध्ये आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून गोळीबारासाठी वापरण्यात आलेली गन हस्तगत केली आहे.

हल्लेखोराच्या पत्नीची होणार चौकशी

हाफ मून बेमधील घटनेनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत गोळीबारावेळी अनेक मुले तेथे होती असे सांगितले. हल्लेखोर रोपवाटिकेत काम करायचा. पोलीस  गोळीबाराप्रकरणी त्याच्या पत्नीचीही चौकशी करणार आहेत. कॅलिफोर्नियात होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे तेथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आयोवामध्ये विद्यार्थी लक्ष्य

आयोवामध्ये विशेष मुलांसाठी चालविल्या जाणाऱया एका शाळेत बंदुकधाऱयाने गोळीबार केल्याने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर 3 जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. गोळीबारानंतर एका कारमधून तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली, तर एक आरोपी फरार झाला आहे. हा हल्ला टार्गेट किलिंगचा प्रकार असल्याचे पोलीस अधिकारी पॉल पारिजेक यांनी सांगितले आहे. संबंधित शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 80 टक्के विद्यार्थी हे अल्पसंख्याक समुदायाचे आहेत.

शिकागोमध्ये 2 बळी

गोळीबाराची तिसरी घटना सोमवारी रात्री उशिरा शिकागो येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली आहे. यात 2 जणांना जीव गमवावा लागला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अद्याप कुणालाच अटक करण्यात आली नसली तरीही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

भारतीयांवर ओढवले संकट

अमेरिकेतील गोळीबारात आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथील नंदपु देवांशचा (23 वर्षे) मृत्यू झाला आहे. विशाखापट्टणम येथील लक्ष्मण तेथून पळाल्याने तो वाचला आहे. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशचे तीन विद्यार्थी 10 दिवसांपूर्वीच शिकागोच्या गव्हर्नर्स स्टेट युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतल्यावर अमेरिकेत दाखल झाले होते. त्यांनी शिकागोत घर भाडय़ाने घेत एकत्र वास्तव्य केले होते. तिघेही काही सामग्री खरेदीसाठी शॉपिंग मॉलमध्ये जात असताना दोन गुंडांनी त्यांना रोखले होते, त्यांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि पैसे काढून घेतले होते. यानंतरही गुंडांनी तेथून जात असताना विद्यार्थ्यांवर गोळीबार केला.

Related Stories

जगभरातील बळींचा आकडा 50 हाजारांवर

Patil_p

‘उपाशी भूतां’ना अन्न भरविण्याचा उत्सव

Patil_p

रेल्वे अपघातात पाकमध्ये 50 ठार

Patil_p

‘सीरियल किलर्स’वर जडले प्रेम

Patil_p

चीन : ब्राझीलमधून आयात केलेल्या चिकनमध्ये आढळले कोरोनाचे विषाणू

datta jadhav

अमेरिकेच्या बास्केटबॉलपटूला रशियात तुरुंगवास

Patil_p