Tarun Bharat

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात गोळीबार

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन गटात राडा झाला. यावेळी एकावर जिवघेणा हल्ला करत हवेत गोळीबार करण्यात आला. या राडय़ादरम्यान एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सागर कोळनट्टी (वय 36) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नितीन म्हस्के, रोहण निगडे, सोन्या दोडमणी, धार आज्या यांच्यासह एकूण पाच ते सहा जणांविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान हमीद शेख (30, ताडीवाला रोड, बंडगार्डन) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

अधिक वाचा : सीमाप्रश्नी केंद्राची दुटप्पी नीती; डॉ. नीलम गोऱ्हे यांची टीका

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी इमरान हमीद आपल्या मित्रांसह कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल रॉक वॉटर येथे मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करत होता. पार्टी संपल्यानंतर दुचाकीवरुन घरी परत जात असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून आरोपी सोन्या दोडमनी आणि त्याच्या साथीदारांनी सागर कोळनटी याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर दोन गटात राडा झाला. यावेळी सोन्या दोडमनी याने हवेत गोळीबार केला. यावेळी इतर आरोपींनी सागर कोळनटी याला जबर मारहाण केली. यात कोळनटी गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरेगाव पार्क पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

Related Stories

केरळ सेट परीक्षेत धानय्या कौटगीमठ यांच्या पुस्तकांतून तब्बल ४० प्रश्न

Archana Banage

धक्कादायक : तेलंगणामध्ये अल्पवयीन मुलीवर तब्बल ८० जणांनी केला बलात्कार

Archana Banage

अफगाणिस्तानातील भारतीयांना लवकरचं देशात आणले जाईल – परराष्ट्र मंत्री जयशंकर

Archana Banage

Kolhapur Breaking : मिनी ट्रॅव्हल्स आणि ईनोव्हाचा अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

Abhijeet Khandekar

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं निधन

Archana Banage

शिस्तभंगाची कारवाई कोणावर होणार हे लवकरच कळेल : उदय सामंत

datta jadhav
error: Content is protected !!