एका साधूचा मृत्यू, अन्य एकजण जखमी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यथार्थ गीताचे संस्थापक स्वामी अडगडानंद महाराज यांच्या सक्तेशगड आश्रमात गुरुवारी सकाळी गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली. या घटनेत एका साधूचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱयावर चांदौली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेच्यावेळी स्वामी अडगदानंद महाराज आश्रमात त्यांच्या खोलीत उपस्थित होते. या घटनेबाबत विविध चर्चा सुरू असून स्वामी अडगदानंद महाराज यांच्या हत्येचा कट रचल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पिस्तुले जप्त केली आहेत.
गोळी लागल्याने मृत्युमुखी पडलेले साधू जीवनबाबा हे सिहोर जिह्यातील शिवपूर (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. तर जखमी साधू आशिष महाराज (वय 46) यांच्यावर चांदौली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीवनबाबाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पण स्वामी अडगदानंद यांच्या अगदी जवळ असलेल्या आशिष महाराज यांना त्यांनी आधी गोळय़ा घातल्याची चर्चा आहे. त्यानंतर स्वतःच्या डोक्मयात गोळी झाडल्याचा तपास यंत्रणांचा कयास आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱयाचे फुटेज पाहून तपासाला गती देण्यात आली आहे.